Homeताज्या बातम्याशिउबाठाच्या विजय करंजकरांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता
शिउबाठाच्या विजय करंजकरांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता
नाशिक, ५ मे २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय आप्पा करंजकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही तासातच प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजय आप्पा करंजकर यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. शिउबाठातून उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज होते. त्यामुळे करंजकर हे पाऊल उचलणार असल्याची माहिती आहे. करंजकरांचा शिवसेनेत होणारा प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या […]
नाशिक, ५ मे २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय आप्पा करंजकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही तासातच प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजय आप्पा करंजकर यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. शिउबाठातून उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज होते. त्यामुळे करंजकर हे पाऊल उचलणार असल्याची माहिती आहे. करंजकरांचा शिवसेनेत होणारा प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देणार आहे.