मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी बुधवारी राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव आले होते. निवडणुकीची पुढील रणनिती ठरवण्यात आली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली. मुंबईतील एकूण सहा जागा महायुती जिंकेल असं वातावरण आहे. त्याचबरोबर आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही काम करू असेही त्यांनी माध्यमांना सांगितले. ठाणे आणि कल्याण सर्व काम करत आहेत. सर्व १५ उमेदवार मुंबईमध्ये षटकार मारणार अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.