वायकर पहिल्यांदाच लोकसभा लढवणार

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे रवींद्र वायकर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. वायकरांना शिवसेनेने वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. वायकरांच्या विरोधात शिउबाठाचे अमोल किर्तीकर आणि वंचितचे संजीव काळकोरी आहेत. वायकरांपुढील आव्हान : रवींद्र वायकर यांच्या विरोधात उभे असलेले अमोल किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. अमोल […]

वायकर पहिल्यांदाच लोकसभा लढवणार

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे रवींद्र वायकर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. वायकरांना शिवसेनेने वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. वायकरांच्या विरोधात शिउबाठाचे अमोल किर्तीकर आणि वंचितचे संजीव काळकोरी आहेत.

वायकरांपुढील आव्हान : रवींद्र वायकर यांच्या विरोधात उभे असलेले अमोल किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. अमोल निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळेच गजानन किर्तीकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. यामुळे वायकरांपुढे किर्तीकरांच्या मुलाचा पराभव करणे हेच मोठे आव्हान असेल. गजानन किर्तीकर दीर्घ काळ वायव्य मुंबईतून खासदार होते. यामुळे किर्तीकरांची मतदारसंघात ताकद आहे. पण ही ताकद यावेळी मुलाच्या पाठिशी असेल की वायकरांसोबत असेल हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

वायव्य मुंबई – रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित

कोण आहेत रवींद्र वायकर ?

मुंबई महापालिकेचे नगरसेवक – १९९२
मुंबई महापालिकेचे नगरसेवक – १९९७
मुंबई महापालिकेचे नगरसेवक – २००२
मुंबई महापालिकेचे नगरसेवक – २००७
मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष – २००६ ते २०१०
आमदार – २००९
आमदार – २०१४
गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री – २०१४ ते २०१९
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री – २०१४ ते २०१९
आमदार – २०१९

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number