Tuesday, December 03, 2024 10:47:14 PM

डॉ.शोभा बच्छाव भरणार उमेदवारी अर्ज

डॉशोभा बच्छाव भरणार उमेदवारी अर्ज

धुळे, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : धुळे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शोभा बच्छाव शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात,काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील शिउबाठा गटाचे सहसंपर्कप्रमुख अशोक धात्रक यांची उपस्थितीत भरणार आपला उमेदवारी अर्ज. धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची उपस्थित राहणार.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo