कोल्हापूर, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : संधी मिळाली तर काँग्रेस पाच वर्षांत पाच पंतप्रधान माथी मारेल, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस म्हणजे अस्थिर सरकार, असेही मोदी म्हणाले. ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले शाहू छत्रपती यांच्यात लढत होणार आहे.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
काँग्रेसला दलितांचे आरक्षण संपवायचेय – मोदी
कर्नाटकात काँग्रेसने मुसलमान ओबीसी केले – मोदी
नकली सेना औरंग्याच्या समर्थकांसोबत – मोदी
बोलावूनही श्रीराम दर्शनाला काँग्रेसी आले नाहीत – मोदी
राम दर्शनाला अन्सारी आले, पण काँग्रेस अनुपस्थित – मोदी
हिंदू विरोधकांचा गौरव बाळासाहेबांना पाहावला असता?- मोदी
शिवरायांची भूमी काँग्रेसला थारा देणार नाही – मोदी
काँग्रेसला ३७० आणि सीएए नकोय – मोदी
काँग्रेस पाच वर्षात पाच पंतप्रधान माथी मारेल – मोदी
काँग्रेस सरकार म्हणजे अस्थिर सरकार – मोदी
काँग्रेसकडून जहरी प्रचार – पंतप्रधान मोदी
जागा जिंकत नाहीत ते सरकार काय स्थापन करणार ? – मोदी
जगात भारी कोल्हापुरी – मोदी
तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरकरांवर मुख्य जबाबदारी – मोदी
कोल्हापूरकर काँग्रेस आघाडीला भूईसपाट करतील – मोदी
दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला आघाडी – मोदी
काँग्रेसने प्रचारात दोन घोडचुका केल्या – मोदी