ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

पश्चिम बंगाल, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : एका महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यादा जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून जात असताना सीटवर पडल्या.या घटनेत ममता बॅनर्जी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय निसटला व त्या सीटवर जोरात आपटल्या. ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने दुर्गापूरहून आसनसोलला निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बसत […]

ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

पश्चिम बंगाल, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : एका महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यादा जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून जात असताना सीटवर पडल्या.या घटनेत ममता बॅनर्जी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय निसटला व त्या सीटवर जोरात आपटल्या.

ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने दुर्गापूरहून आसनसोलला निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बसत असतानाच त्या पाय घसरून पडल्या त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून सीटवर बसवलं. त्यात त्यांना किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने आसनसोलला रवाना झाल्या.

तृणमूलच्या प्रमुख व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही दिवसापूर्वीही जखमी झाल्या होत्या. घरात ट्रेडमिलवर चालत असताना त्या दुखापतग्रस्त झाल्या होत्या. या घटनेत बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर तीन टाके घालण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number