नसीम खान काँग्रेसवर नाराज

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नसीम खान वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेस नेतृत्वावर नाराज झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला मुसलमानांची मते हवी आहेत पण प्रतिनिधित्व का देत नाही ? असा प्रश्न […]

नसीम खान काँग्रेसवर नाराज

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नसीम खान वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेस नेतृत्वावर नाराज झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला मुसलमानांची मते हवी आहेत पण प्रतिनिधित्व का देत नाही ? असा प्रश्न उपस्थित करत नसीम खान यांनी त्यांच्या तीव्र भावना पत्राद्वारे काँग्रेस नेतृत्वाला कळवल्या आहेत.

वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण ही जागा काँग्रेसने शिउबाठाला सोडली. शिउबाठाने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही उमेदवारी जाहीर होताच नसीम खान नाराज झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number