निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना ‘क्लीनचिट’

पुणे, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील ‘कचाकचा बटण दाबा’ अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल असे वक्तव्य केले होते. ‘कचाकचा बटण दाबा’ यावर राशपकडून आक्षेप घेण्यात आला होता. या व्यक्तव्याची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात […]

निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना ‘क्लीनचिट’

पुणे, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील ‘कचाकचा बटण दाबा’ अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल असे वक्तव्य केले होते. ‘कचाकचा बटण दाबा’ यावर राशपकडून आक्षेप घेण्यात आला होता. या व्यक्तव्याची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव घेतले नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही असे निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number