‘राजेंचा पराभव निश्चित’

सातारा, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सोळा जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. निवडणुकीचे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले असून, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, चिन्हांचेही वाटप अपक्ष उमेदवारांना करण्यात आले. मात्र चर्चा […]

‘राजेंचा पराभव निश्चित’

सातारा, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सोळा जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. निवडणुकीचे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले असून, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, चिन्हांचेही वाटप अपक्ष उमेदवारांना करण्यात आले. मात्र चर्चा आहे जयंत पाटलांच्या दाव्याची काय दावा पाहुयात…

सातारा लोकसभा मतदारंसघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे…यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैलगाडीतून भव्य रॅली काढली.यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह जयंत पाटील यांची जावली तालुक्यातील…केळघर येथून बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.या रॅलीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी जयंत पाटील यांनी उदयनराजे यांच्या पराभवाचा दावा केला आहे. काय म्हणाले पाहुयात.

भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजेंना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली. शाहांना भेटून साताऱ्यात परतल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पण, महायुतीतील अंतर्गत वादांमुळे उदयनराजेंची उमेदवारी लटकली होती. हाच मुद्दा धरू जयंत पाटलांनी रजेवर टीका केली…

2019 च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती. उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र, काही महिन्यांत राजीनामा देऊन त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. भाजपनं उदयनराजेंना तिकीट दिलं. परंतु, राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number