संभाजीनगरात खान की बाण ?

छत्रपती संभाजीनगर, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथे संपूर्ण जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम आहे. गावागात सध्या चालू असलेल्या राजकारणाविषयी चर्चा होत आहे. महायुतीने येथून मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे आज (२२ एप्रिल) चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. […]

संभाजीनगरात खान की बाण ?

छत्रपती संभाजीनगर, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथे संपूर्ण जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम आहे. गावागात सध्या चालू असलेल्या राजकारणाविषयी चर्चा होत आहे. महायुतीने येथून मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे आज (२२ एप्रिल) चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथून कोण जिंकणार असे विचारले जात आहे. पण एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर आता भुमरेंच्या उमेदवारीला महायुतीतूनच विरोध होतोय..

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने पैठण विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही इच्छुक विनोद पाटील यांनी आपला उमेदवारीचा दावा कायम ठेवला आहे. या संदर्भात त्यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पुनर्विचार होऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर मला महायुतीकडून उमेदवारी हवी आहे. मात्र, ती मिळाली नाही तरी देखील मी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

लढत

छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संदिपान भुमरे, शिवसेना विरुद्ध चंद्रकांत खैरे, शिउबाठा विरुद्ध, अफसार खान, वंचित विरुद्ध इम्तियाज जलील, एमआयएम अशी लढत होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०१९
इम्तियाज जलील, एमआयएम – ३ लाख ८९ हजार ४२ मते – ४४९२ मतांनी विजयी
चंद्रकांत खैरे, शिवसेना – ३ लाख ८४ हजार ५५० मते – पराभूत
हर्षवर्धन जाधव, अपक्ष – २ लाख ८३ हजार ७९८ मते – पराभूत
सुभाष झांबड, काँग्रेस – ९१ हजार ७९० मते – पराभूत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number