‘ज्यांच्या नावात जय त्यांचा पराजय अशक्य’

अहमदनगर, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावातच जय आहे. यामुळे त्यांचा पराजय अशक्य आहे. आपल्याला फक्त त्यांचे मताधिक्य वाढवायचे आहे. विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. महाविकास आघाडीचे दहन करण्याचा संकल्प हनुमान जयंतीच्या दिवशी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर […]

‘ज्यांच्या नावात जय त्यांचा पराजय अशक्य’

अहमदनगर, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावातच जय आहे. यामुळे त्यांचा पराजय अशक्य आहे. आपल्याला फक्त त्यांचे मताधिक्य वाढवायचे आहे. विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. महाविकास आघाडीचे दहन करण्याचा संकल्प हनुमान जयंतीच्या दिवशी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौपाटी कारंजा येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मविआवर टीका केली. मोदींनी चंद्रयान लाँच केले पण काँग्रेसला राहुल गांधींचे लाँचिंग करणे जमलेले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदी देशाच्या विकासाकरिता अविश्रांत काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांना मत म्हणजे मोदींना मत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व पाणी योजना पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

डॉ. सुजय विखे यांची गाडी दिल्लीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आता तो निर्णय होणार आहे. त्यामुळे खासदार म्हणून डॉ. सुजय विखे यांची गाडी दिल्लीला रवाना करायची आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या विकास गाडीमध्ये सामान्यांना जागा आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश आणखी विकसित आणि सक्षम होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यामुळे मतदारांनी सुजय यांच्यासारख्या तरुण व तडफदार युवकाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number