संभाजीनगर , २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आज (२२ एप्रिल २०२४) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी शिउबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खैरे हे रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत.सकाळी १० वाजता क्रांती चौक ते संस्थान गणपती मंदिर अशी रॅली निघणार आहे. रॅलीत आणि उमेदवारी अर्ज भरताना आ. अंबादास दानवे, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, माजी मंत्री आ आमदार राजेश टोपे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, नामदेवराव पवार, संजय वाघचौरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. दरम्यान, खैरे यांची ज्यांच्याशी प्रामुख्याने लढत होणार आहे ते महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे हे २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी हजर राहणार आहेत.