उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पुणे मनपाची कारवाई

पुणे , २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने पुणे मनपा पाऊलं उचलू लागली आहे. या अंतर्गत पुण्यात उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिका वारंवार कारवाई करत आहे. गेल्या साडे तीन महिन्यात १६ हजार नागरिकांवर कारवाई करून ६६ लाख ३४ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पण तरीही शहरात […]

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पुणे मनपाची कारवाई

पुणे , २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने पुणे मनपा पाऊलं उचलू लागली आहे. या अंतर्गत पुण्यात उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिका वारंवार कारवाई करत आहे. गेल्या साडे तीन महिन्यात १६ हजार नागरिकांवर कारवाई करून ६६ लाख ३४ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पण तरीही शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने हे कचरा टाकणारे सुधारण्याऐवजी शिरजोर होत असल्याचे चित्र आहे.

पुणे शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहराचे एकूण क्षेत्रफळ ५४३ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. शहरात रोज २१०० ते २२०० टन कचरा निर्माण होत आहे. महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते झाडणे,कचरा उचलणे यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. पण तरीही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे.

शहरात उघड्यावर कचरा टाकणारे सुमारे ९०० ठिकाणे होते. त्याठिकाणी उपाययोजना करून प्रशासनाने ही संख्या ६०० पर्यंत खाली आणली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यात थांबून नागरिकांना उघड्यावर कचरा टाकताना मज्जाव करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number