बुलढाण्यात सभांचा रविवार

बुलढाणा , २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते हे विविध मतदारसंघात जाऊन प्रचार सभेतून आपल्या उमेदवाराला पाठिंबा देताना दिसात आहेत. अशातच आज (२१ एप्रिल २०२४) रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बुलढाण्यात वरवट बकाल येथे सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार प्रतापराव […]

बुलढाण्यात सभांचा रविवार

बुलढाणा , २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते हे विविध मतदारसंघात जाऊन प्रचार सभेतून आपल्या उमेदवाराला पाठिंबा देताना दिसात आहेत. अशातच आज (२१ एप्रिल २०२४) रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बुलढाण्यात वरवट बकाल येथे सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी जे. पी. नड्डा सभेला उपस्थित राहणार आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांच्यासाठी राशपचे नेते शरद पवार, शिउबाठाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांची खामगावात सायंकाळी सभा होत आहे.

मतदान तोंडावर आले असताना मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची रविवारी १२.२५ वाजता वरवट बकाल येथे सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात सभा होत आहे. यावेळी माजी मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री, आमदार डाॅ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तेथील सभा आटोपून ते कर्नाटकातील हुबळी येथे जाणार आहेत.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थखामगावातील जे. व्ही. मेहता स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता सभा होत आहे. या सभेत शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात तयारी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number