पुणे, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिलला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. बारामती, पुणे, शिरूर, मावळसाठी ही सभा होणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.