राजदकडून चिराग पासवान यांना शिवीगाळ

जमुई, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : प्राचीन काळी नालंदा विद्यापीठामुळे शिक्षणाचे माहेर अशी बिहारची ओळख होती. पण आता बिहारच्या राजकारणात शिव्याशापांना महत्त्व आले आहे. जमुई येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू असताना राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांकडून लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या आईला शिव्या देण्यात आल्या. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मंचावर असताना हा प्रकार […]

राजदकडून चिराग पासवान यांना शिवीगाळ

जमुई, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : प्राचीन काळी नालंदा विद्यापीठामुळे शिक्षणाचे माहेर अशी बिहारची ओळख होती. पण आता बिहारच्या राजकारणात शिव्याशापांना महत्त्व आले आहे. जमुई येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू असताना राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांकडून लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या आईला शिव्या देण्यात आल्या. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मंचावर असताना हा प्रकार घडला. या विषयावर प्रतिक्रिया विचारली असताना चिराग पासवान यांनी संयम बाळगला. लोक जनशक्ती पक्षानेही या घटनेनंतर संयम बाळगला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते पातळी सोडत असताना लोक जनशक्ती पक्षाकडून संयम बाळगला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number