‘…तर पदरात धोंडे पडतील’

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना टोला लगावला. सून आणि मुलीत फरक करणाऱ्यांच्या पदरात धोंडे पडतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. याआधी शरद पवारांनी सुनेत्रा पवार या […]

‘…तर पदरात धोंडे पडतील’

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना टोला लगावला. सून आणि मुलीत फरक करणाऱ्यांच्या पदरात धोंडे पडतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. याआधी शरद पवारांनी सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार असल्याचे वक्तव्य केले होते. पवारांच्या याच वक्तव्याचा समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला.

सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, रिपाईंच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, भाजपा नेते चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, आमदार दत्ता भरणे, आमदार राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार रमेश थोरात, शरद ढमाले, अशोक टेकावडे, योगेश टिळेकर, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार महायुतीतील सर्व घटक पक्षांचे राष्ट्रीय, राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या या सभेतच शिउबाठाच्या कुलदीप कोंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कुलदीप कोंडे यांच्या प्रवेशामुळे महायुतीच्या उमेदवाराचे पुणे जिल्ह्यातील भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघातील मताधिक्य वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number