आमदार देवयांनी फरांदेंची सुरक्षेत वाढ

नाशिक, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या पोलीस सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आलेल्या धमकीनंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आमदार देवयानी फरांदे यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आला आहे तसेच त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. ३ एप्रिल रोजी नाशिकच्या उपनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोहम्मद पैगंबर […]

आमदार देवयांनी फरांदेंची सुरक्षेत वाढ

नाशिक, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या पोलीस सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आलेल्या धमकीनंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आमदार देवयानी फरांदे यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आला आहे तसेच त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. ३ एप्रिल रोजी नाशिकच्या उपनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोहम्मद पैगंबर यांच्या बाबग आक्षेपार्ह पोस्ट वायरल झाल्यानंतर मुस्लिम समाज एकत्र रस्त्यावर आला आणि आंदोलन केले. मात्र यामधील काही मुस्लिम तरुणांकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे आरोप फरांदे यांच्याकडून करण्यात आला. या घटनेविरुद्ध आवाज उठवत कारवाईची मागणी फरांदे यांनी केली होती. त्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आली आहे तसेच फरांदे यांच्या विरोधातील विविध पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number