भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका शुक्रवारपासून पार पडणार आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीने १३ वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीतून नारायण राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपाकडून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली आहे. राणे शुक्रवारी उमेदवार अर्ज भरणार आहेत.गेल्या काही दिवसापासून […]

भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका शुक्रवारपासून पार पडणार आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीने १३ वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीतून नारायण राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपाकडून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली आहे. राणे शुक्रवारी उमेदवार अर्ज भरणार आहेत.गेल्या काही दिवसापासून राणेंच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा होत्या आणि त्यावर स्वत: राणे यांनी त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number