महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर सभा

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात गुरूवारी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि जाहीर सभा होणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा आहे. तर महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या […]

महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर सभा

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात गुरूवारी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि जाहीर सभा होणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा आहे. तर महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात,  संजय जगताप, संग्राम थोपटे आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number