नवी दिल्ली, प्रतिनिधी, दि. १७ एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणूका अगदी जवळ आल्या आहेत. तर, १८व्या लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याला ४८ तासापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना समाजमाध्यमांमध्ये सर्रासपणे जनमत सर्वेक्षण केले जात आहे. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अंदाज व्यक्त केले जात आहे. काही न्यूज चॅनेलनेही सुद्धा हे सर्वेक्षण चालविले आहे. समाज माध्यमांवर तर या हे जनमत सर्वेक्षण सुरू असून अनेक पक्षाचे नेते आपल्या सोयीचे जनमत सर्वेक्षण हे व्हॉट्सअप, एक्स, फेसबुकच्या साहाय्याने लोकांना प्रभावित करण्यासाठी उपयोग करून घेत आहे. या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने जनमत सर्वेक्षण व एक्झिट पोलवर संपूर्ण बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे.