डॉ. अमोल कोल्हे यांचं ज्येष्ठ नागरिकासोबत असभ्य वर्तन

पुणे, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राशपचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकासोबत असभ्य वर्तन केले. दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातून डॉ. अमोल कोल्हे यांनी माईक खेचून घेतला. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील निओ रिगल सोसायटीत ही घटना घडली. दिलीप वळसे पाटील हाड मोडल्यामुळे वैद्यकीय उपचार घेत […]

डॉ. अमोल कोल्हे यांचं ज्येष्ठ नागरिकासोबत असभ्य वर्तन

पुणे, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राशपचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकासोबत असभ्य वर्तन केले. दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातून डॉ. अमोल कोल्हे यांनी माईक खेचून घेतला. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील निओ रिगल सोसायटीत ही घटना घडली.

दिलीप वळसे पाटील हाड मोडल्यामुळे वैद्यकीय उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या परिस्थितीत त्यांच्या विरोधात बोलणे आणि ते मुद्दाम प्रचाराला येत नाही अशा स्वरुपाचे वक्तव्य करून संशय निर्माण करणे योग्य नसल्याचे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number