सांगली, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कधीकाळी ज्या सांगलीत काँग्रेस राजकारणाने राज्याच्या राजकारणावर ठसा उमठवला, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजकारणात सर्वदूर आपल्या नेतृत्वाची आणि प्रतिभेची छाप सोडली त्याच वसंतदादा पाटील घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे एकमेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या नादात महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये शिउबाठा गटाकडून सांगलीच्या जागेचा अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा करण्यात आला आणि चंद्रहार पाटील यांच्याच उमेदवारीवर अंतिम जागावाटपात शिक्कामोर्तब करण्यात आले. आता विशाल पाटील अपक्ष लढवणार की भाजपात जाणार ?
सांगलीतील लढत
संजयकाका पाटील
उमेदवार, भाजपा
चंद्रहार पाटील
उमेदवार शिउबाठा
गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे. हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे 2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्यावर आली. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो इर्ष्येचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरु आहे त्यामध्ये कोण कोणाचा बळी देणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. सांगलीच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार? यामध्येही खेळ रंगणार आहे.
सांगलीच्या वेदनेवर कोल्हापुरचा उतारा
विश्वजीत कदमांना सतेज पाटील म्हणतायत ‘दमानं घ्या!’
गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे. हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे 2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्यावर आली. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो इर्ष्येचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरु आहे त्यामध्ये कोण कोणाचा बळी देणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. सांगलीच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार? यामध्येही खेळ रंगणार आहे.
आता चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला जर मविआच्या घटक पक्षाचा विरोध असेल तर चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला ते हातभार लावतील का ? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो सोबतच जर मित्र पक्षाचे बळ चंद्रहार पाटलांना मिळाले नाही तर ते एकाकी पडतील का ?