पुणे, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांनी आई, पत्नीसह सासुरवाशीणींचा अवमान केला, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील म्हणाल्या. सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. यासाठी त्या सासुरवाशीणीने केलेला त्याग शरद पवारांनी मातीमोल ठरवल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. सून परकी, बाहेरची अशा आशयाचे वक्तव्य म्हणजे शरद पवारांचा धृतराष्ट्र झाल्याचे लक्षण आहे. मुलीवरील प्रेमापोटी त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे; असेही रुपाली पाटील म्हणाल्या.