नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान मोदींनी बुधवारी भारतातील टॉप गेमर्सची भेट घेतली. देशातील गेमिंग कम्युनिटीसाठी ही भेट महत्त्वाची आहे. भारतातील गेमिंग कल्चर, ई-स्पोर्ट्स यांची वाढ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव या विषयांच्या चर्चेला मोदी आणि गेमर्सच्या भेटीमुळे उधाण आले आहे.
पंतप्रधान मोदींना भेटलेले गेमर्स गेमिंग विश्वात तसेच सोशल मीडियात लोकप्रिय आहेत. मोदींना भेटलेल्या गेमर्समध्ये ई-स्पोर्ट्स चॅम्पियन आणि कंटेंट क्रिएटर्सचा समावेश आहे. गेमर्ससोबत संवाद साधल्यानंतर मोदी स्वतः थोडा वेळ गेम्स खेळले.