आणखी एक माजी प्रशासकीय अधिकारी भाजपात

नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंजाबमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सिद्धू आणि त्यांचे पती यांनी भाजपात प्रवेश केला. परमपालकौर सिद्धू पंजाब राज्य औद्योगिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होत्या. त्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्य सचिवांनी […]

आणखी एक माजी प्रशासकीय अधिकारी भाजपात

नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंजाबमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सिद्धू आणि त्यांचे पती यांनी भाजपात प्रवेश केला. परमपालकौर सिद्धू पंजाब राज्य औद्योगिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होत्या. त्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्य सचिवांनी परमपालकौर सिद्धू यांचा राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.

कोण आहेत परमपालकौर सिद्धू?

परमपालकौर सिद्धू २०११च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी
ऑक्टोबर २०२३ मध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला
स्वेच्छानिवृत्तीला मंजुरी मिळण्याआधीच राजीनामा सादर केला
भटिंडा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

कोण आहेत भटिंडाच्या खासदार ?

अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरतकौर बादल सध्या भटिंडाच्या खासदार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number