अमित शाहंचा काँग्रेसवर हल्लाबोल

नांदेड, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पवार आणि उद्धवनी महाराष्ट्रात काँग्रेसला संपवलं…. विरोधक राज्याचा विकास करू शकत नाही. मोदी सरकारच्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं झाली… यापुढेही होतील; अशी ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडच्या सभेतून भाजपाच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा प्रचार केला. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर निवडणूक रिंगणात […]

अमित शाहंचा काँग्रेसवर हल्लाबोल

नांदेड, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पवार आणि उद्धवनी महाराष्ट्रात काँग्रेसला संपवलं…. विरोधक राज्याचा विकास करू शकत नाही. मोदी सरकारच्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं झाली… यापुढेही होतील; अशी ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडच्या सभेतून भाजपाच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा प्रचार केला.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर निवडणूक रिंगणात आहेत. पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. वसंतराव चव्हाण आणि वंचितचे अॅड. अविनाश भोसीकर हे निवडणूक रिंगणात आहेत.

अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

भाजपाने नक्षलवादाचा बीमोड केला
दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई
पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं
पवार, उद्धव यांनी राज्यातल्या काँग्रेसला संपवलं
पवार आणि उद्धव विकास करू शकत नाहीत
विरोधक राज्याचा विकास करू शकत नाही
मोदी सरकारच्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं झाली… यापुढेही होतील
भाजपानं औरंगाबाद, उस्मानाबादचं नाव बदललं; पवारांनी काय दिलं ?
प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी होतील
पाटील चिखलीकरांना म्हणजे मोदींना मत
मोदींना मत म्हणजे विकासाला आणि देशाच्या सुरक्षेला, प्रतिष्ठेला मत

फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

निर्णयाची अंमलबजावणी करणारे मोदी सरकार
मोदी म्हणजे विकासाचं इंजिन
प्रतापराव पाटील चिखलीकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील
काँग्रेसला राज्यात शून्यावर आणायचंय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number