मुंबई, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर डॉ. शोभा बच्छाव निवडणूक लढवतील. तर जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर कल्याण काळे निवडणूक लढवतील.
अशी होणार लढत
जालना – रावसाहेब दानवे पाटील, भाजपा विरुद्ध कल्याण काळे, काँग्रेस विरुद्ध प्रभाकर बकले, वंचित (मतदान १३ मे २०२४)
धुळे – सुभाष भामरे, भाजपा विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस विरुद्ध अब्दुर रहमान, वंचित (मतदान २० मे २०२४)