‘आप’ला धक्का, मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : ‘आप’च्या राजकुमार आनंद यांनी केजरीवाल सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देत राजकुमार यांनी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दिल्लीतील पटेल नगरचे आमदार असलेल्या राजकुमार आनंद यांनी ‘आप’च्या भ्रष्टाचाराबाबतच्या धोरणाला विरोध म्हणून राजीनामा दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने राजकुमार आनंद यांच्या मालमत्तांवर धाड टाकली होती. […]

‘आप’ला धक्का, मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : ‘आप’च्या राजकुमार आनंद यांनी केजरीवाल सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देत राजकुमार यांनी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दिल्लीतील पटेल नगरचे आमदार असलेल्या राजकुमार आनंद यांनी ‘आप’च्या भ्रष्टाचाराबाबतच्या धोरणाला विरोध म्हणून राजीनामा दिला.

नोव्हेंबर २०२३ मध्ये दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने राजकुमार आनंद यांच्या मालमत्तांवर धाड टाकली होती. अनेक कागदपत्रे तपासण्यात आली होती. या कारवाईतून हाती आलेल्या माहितीआधारे तपास पुढे सरकला आणि २०२४ मध्ये दिल्ली दारू घोटाळ्यात केजरीवाल यांनाच अटक झाली. या अटकेला एक महिना होण्याआधीच राजकुमार आनंद यांनी केजरीवाल सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सध्या केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. तर राजकुमार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number