नवी दिल्ली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करत भाजपाने अलाहाबादच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी आणि चंदीगडच्या खासदार किरण खेर यांचे तिकीट कापले. अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी आणि चंदीगडमधून संजय टंडन यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. आसनसोल येथून निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे कळवल्यामुळे पवन सिंह यांच्याऐवजी सुंदरजीत सिंग अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नवी यादी
रिटा बहुगुणा जोशी आणि किरण खेर यांचे तिकीट कापले
अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी आणि चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी