मुख्य निवडणूक आयुक्तांना झेड दर्जाचे संरक्षण

नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाआधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. भारतात निवडणूक लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेसाठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार […]

मुख्य निवडणूक आयुक्तांना झेड दर्जाचे संरक्षण

नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाआधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

भारतात निवडणूक

लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेसाठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी सात टप्प्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर ४ जून रोजी होणार आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुरक्षेशी संबंधित आवश्यक ते निर्णय घेतले जात आहेत.

भारतातील वेगवेगळ्या दर्जाचे संरक्षण

विशेष संरक्षण – पंतप्रधान आणि निवडक व्यक्तींसाठी

झेड प्लस – यात ५५ सुरक्षा रक्षक. किमान दहा एनएसजी कमांडो आणि इतर पोलीस

झेड – यात २२ सुरक्षा रक्षक. किमान चार ते सहा एनएसजी कमांडो आणि इतर पोलीस

वाय प्लस – यात ११ सुरक्षा रक्षक. किमान दोन ते चार कमांडो आणि इतर पोलीस

वाय – यात ८ सुरक्षा रक्षक. किमान एक ते दोन कमांडो आणि इतर पोलीस

एक्स – यात २ सुरक्षा रक्षक.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number