ठाणे, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. यानंतर धाराशिवमधील मंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी पक्षाच्या नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तानाजी सावंतांच्या पुतण्याने समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि भाजपाचे आममदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात दीर्घ काळापासून वाद आहे. अर्चना पाटील या राणा जगजीतसिंह पाटील यांची पत्नी आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तानाजी सावंत समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अशी आहे लढत
उस्मानाबाद (धाराशिव) – अर्चना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ओमराजे निंबाळकर, शिउबाठा (मतदान ७ मे २०२४)