गोडसेंच्या उमेदवारीवरून आखाडा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महायुतीमध्ये नाशिकच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून धूसफूस असलेली पाहायला मिळत आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष नाशिकच्या जागेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि शिवसेनेकडून हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. अशातच नाशिकच्या जागेवरून आता आखाडा परिषदेने या प्रकरणात देखील उघडी घेतली आहे. अखिल भारतीय […]

गोडसेंच्या उमेदवारीवरून आखाडा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महायुतीमध्ये नाशिकच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून धूसफूस असलेली पाहायला मिळत आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष नाशिकच्या जागेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि शिवसेनेकडून हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. अशातच नाशिकच्या जागेवरून आता आखाडा परिषदेने या प्रकरणात देखील उघडी घेतली आहे. अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. कुंभमेळ्याला नाशिकमध्ये संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने त्याच्याकडे ठेवण्याची मागणी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number