मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात पहिला अपघात

मुंबई, ०४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात गुरुवारी (०४ एप्रिल) पहिला अपघात झाला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्याच्या आत वाहतूक कोंडी दिसून आली. झालेल्या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा कोरोला अल्टीस कार धडकल्याचे पहायला मिळाले. या अपघातात कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. खराब झालेली गाडी बाहेर […]

मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात पहिला अपघात

मुंबई, ०४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात गुरुवारी (०४ एप्रिल) पहिला अपघात झाला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्याच्या आत वाहतूक कोंडी दिसून आली. झालेल्या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा कोरोला अल्टीस कार धडकल्याचे पहायला मिळाले. या अपघातात कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. खराब झालेली गाडी बाहेर पडण्याच्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेला नेली जात असल्यानेही वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान तीन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यात आले. कोस्टल रोडकडे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची खूण म्हणून पाहिले जाते. मात्र आता या रोडवरही अपघात झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number