नवनीत राणांना दिलासा

अमरावती, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा दिला आहे. नवनीत राणांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे. याआधी मुंबईच्या उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अमरावती या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक […]

नवनीत राणांना दिलासा

अमरावती, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा दिला आहे. नवनीत राणांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे. याआधी मुंबईच्या उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अमरावती या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा नवनीत राणांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number