वंचितचा काँग्रेस बंडखोराला पाठिंबा

नागपूर, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून बंड करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय घेत वंचितने रामटेकमधील त्यांचा अधिकृत उमेदवार मागे घेतला आहे. वंचितच्या निर्णयामुळे काँग्रेसची पंचाईत झाल्याची चर्चा आहे. आता रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध […]

वंचितचा काँग्रेस बंडखोराला पाठिंबा

नागपूर, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून बंड करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय घेत वंचितने रामटेकमधील त्यांचा अधिकृत उमेदवार मागे घेतला आहे. वंचितच्या निर्णयामुळे काँग्रेसची पंचाईत झाल्याची चर्चा आहे. आता रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं अशी लढत होणार आहे. रामटेक मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

याआधी २०१९ मध्ये किशोर गजभिये रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. यावेळी काँग्रेसने किशोर गजभिये यांच्याऐवजी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. पण जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर त्यांची उमेदवारी रद्द झाली. यानंतर काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number