निरुपम पुन्हा शिवसेनेत जाणार

मुंबई, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : संजय निरुपम पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. संजय निरुपम सध्या काँग्रेसमध्ये आहेत. पण काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. काँग्रेसचा हा निर्णय समजताच नाराज झालेल्या निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय निरुपम आधी शिवसेनेत होते. शिवसेनेकडून […]

निरुपम पुन्हा शिवसेनेत जाणार

मुंबई, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : संजय निरुपम पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. संजय निरुपम सध्या काँग्रेसमध्ये आहेत. पण काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. काँग्रेसचा हा निर्णय समजताच नाराज झालेल्या निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय निरुपम आधी शिवसेनेत होते. शिवसेनेकडून ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते. पुन्हा संधी मिळत नसल्याचे बघून त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर संजय निरुपम उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००९ ते २०१४ या काळात खासदार होते. निरुपम नंतर काही काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून निरुपम यांना वगळले. यानंतर निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारतीयांचा सेनेला जास्तीत जास्त पाठिंबा मिळवून देण्यासाठी ते निवडणूक काळात काम करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number