केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची ज्येष्ठ निरुपणकार धर्माधिकारी यांची भेट

ठाणे, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी: केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कपिल […]

केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची ज्येष्ठ निरुपणकार धर्माधिकारी यांची भेट

ठाणे, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी: केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील समाजातील विविध प्रतिष्ठित आणि मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री पाटील यांनी बुधवारी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक सुमित पाटील, राम माळी आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number