महुआ मोईत्राच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयच्या पाठोपाठ ईडीने महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महुआ मोईत्रा यांना सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी संसदेतून बरखास्त करण्यात आले होते. आता […]

महुआ मोईत्राच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयच्या पाठोपाठ ईडीने महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महुआ मोईत्रा यांना सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी संसदेतून बरखास्त करण्यात आले होते. आता याच प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोन्ही केंद्रीय तपास संस्थांनी गुन्हा दाखल केला आहे.

संसदेत महुआ मोईत्रा यांनी ६१ प्रश्न विचारले यापैकी ५० प्रश्न हे एका बड्या समुहाच्या आर्थिक हितांचे संरक्षण करण्याशी संबंधित होते. याच प्रकरणात महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number