बुलढाणा, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रविकांत तुपकरांनी राजू शेट्टींविरोधात शड्डू ठोकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बंड झाले आहे. रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. कष्टकरी शेतकऱ्याचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत
प्रतापराव जाधव, शिवसेना विरुद्ध प्रा. नरेंद्र खेडेकर, शिउबाठा विरुद्ध वसंतराव मगर, वंचित विरुद्ध संजय गायकवाड, शिवसेना बंडखोर विरुद्ध नंदू लवंगे, ओबीसी बहुजन विरुद्ध रविकांत तुपकर, बंडखोर