मुंबई, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत आघाडीचे मविआचे सगळे मार्ग खुंटले आहेत. अकोल्यातून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. याच लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसने वंचितसोबत आघाडीचे सगळे मार्ग आपल्या बाजूने बंद केले.
अकोला लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत
अनुप धोत्रे, भाजपा विरुद्ध अभय पाटील, काँग्रेस विरुद्ध प्रकाश आंबेडकर, वंचित