शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागांची अदलाबदली

मुंबई, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागांची अदलाबदली केली आहे. शिवसेना ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा लढवणार आहे. याआधी ठाण्याचे खासदार राजन विचारे होते जे शिउबाठाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ठाण्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक नरेंद्र म्हस्के, रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्यापैकी एक […]

शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागांची अदलाबदली

मुंबई, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागांची अदलाबदली केली आहे. शिवसेना ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा लढवणार आहे. याआधी ठाण्याचे खासदार राजन विचारे होते जे शिउबाठाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ठाण्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक नरेंद्र म्हस्के, रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्यापैकी एक जण लढण्याची शक्यता आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे शिवसेनेत आहेत. पण त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर छगन भुजबळ यांना लोकसभेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.

ठाण्याचा पेच

ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी शिवसेनेप्रमाणेच भाजपा पण उत्सुक आहे. भाजपाकडून संजय केळकर, संजीव नाईक आणि विनय सहस्रबुद्धे हे तीन जण लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number