प्रकाश शेंडगेंचे नऊ उमेदवार मैदानात

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : जरांगेंचा पाठिंबा घेतला तर आपला संबंध संपला असे सांगत ओबीसी बहुजन पक्षाच्या प्रकाश शेंडगेंनी लोकसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवार जाहीर केले. ओबीसी बहुजन पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. तसेच अकोला लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पक्षाने वंचित उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे. […]

प्रकाश शेंडगेंचे नऊ उमेदवार मैदानात

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : जरांगेंचा पाठिंबा घेतला तर आपला संबंध संपला असे सांगत ओबीसी बहुजन पक्षाच्या प्रकाश शेंडगेंनी लोकसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवार जाहीर केले. ओबीसी बहुजन पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. तसेच अकोला लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पक्षाने वंचित उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे.

१ सांगली – प्रकाश शेंडगे
२ बारामती – महेश भागवत
३ परभणी – हरिभाऊ शेळके
४ हिंगोली – अॅड. रवी शिंदे
५ नांदेड – अॅड. अविनाश भोसीकर
६ यवतमाळ – प्रशांत बोडखे
७ बुलढाणा – नंदू लवंगे
८ शिर्डी – अशोक आल्हाट
९ हातकणंगले – मनीषा डांगे / प्रा. संतोष कोळेकर
कोल्हापूर – काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा
अकोला – वंचित उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा

ओबीसी बहुजन पक्षाची आंबेडकरांपासून फारकत
‘जरांगेंसोबत गेलात तर आपला संबंध संपला’
प्रकाश शेंडगेंचा आंबेडकरांना इशारा
प्रकाश शेंडगेंचे ९ उमेदवार मैदानात

रामटेकमधून वंचितचे शंकर चहांदे

विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर शंकर चहांदे निवडणूक लढणार आहेत. त्यांची उमेदवारी वंचितने शुक्रवारी २९ मार्च रोजी जाहीर केली. वंचितमधून बंड केलेले किशोर गजभिये रामटेकमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number