मोहोळांना उमेदवारी, संजय काकडे नाराज

पुणे, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे संजय काकडे नाराज झाले आहेत. काकडेंनी त्यांची नाराजी भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली आहे. संजय काकडे २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. अनुभव आणि जनसंपर्क यांच्या जोरावर त्यांनी पुणे लोकसभा […]

मोहोळांना उमेदवारी, संजय काकडे नाराज

पुणे, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे संजय काकडे नाराज झाले आहेत. काकडेंनी त्यांची नाराजी भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली आहे.

संजय काकडे २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. अनुभव आणि जनसंपर्क यांच्या जोरावर त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मागितले होते. पण भाजपाने मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करत काकडेंची मागणी डावलली. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष बैठकीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात संजय काकडे यांची हजेरी नव्हती. काकडेंनी त्यांची नाराजी भाजपाच्या नेतृत्वाला कळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपाने अद्याप एबी फॉर्म दिलेला नाही. याआधी २०१९ मध्ये अनिल शिरोळे यांची उमेदवारी रद्द करून दिवंगत खासदार गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाली होती. यामुळे पुण्यात काहीही होऊ शकते; असे संजय काकडे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number