ठाणे, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : ठाणे लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. महायुतीची संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ठाण्याचा शिवसेनेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिउबाठाकडून राजन विचारे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विचारेंच्या विरोधात लढणार असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही. हीच बाब लक्षात आल्यावर राजन विचारे यांनी ‘शिंदेंना उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या’ असे आवाहन केले.