शिर्डी, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाकडून शिर्डीची उमेदवारी मिळताच भाऊसाहेब वाकचौरे यांनी राजकीय विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
अनेक दिवस मौन धारण करून बसलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप धुडकावले. खासदार महोदयांना वैफल्याने ग्रासले आहे, ते दारू पिऊन बरळल्यागत आरोप करत आहेत; असे वक्तव्य भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. मी कधीही भ्रष्टाचार केला नाही, लाच मागितली नाही, कमिशन घेतले नाही. टक्केवारीचे गणित कधीच केले नाही; असे भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले. भ्रष्टाचार खासदार सदाशिव लोखंडे यांनीच केला आहे, असा आरोप भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला.