गांधीनगर, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : बडतर्फ आयपीएस संजीव भट याला ड्रग्जचा बनावट पुरावा तयार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले. संजीव भटने १९९६ मध्ये राजस्थानातील पालनपूरमधील एका हॉटेलच्या खोलीतून दीड किलो अफीम जप्त केल्याची नोंद करून एका वकिलाला अटक केली होती. ही कारवाई केली त्यावेळी संजीव भट बनासकांठाचा पोलीस अधीक्षक होता. पण ही नोंद बनावट असल्याची बाब पुढे उघड झाली. संजीव भटने या प्रकरणात त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला. पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आणि संजीव भटला दोषी ठरवले.