सिमला, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशची मुलगी आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केले. याआधी काँग्रेसची महिला प्रवक्ता सुप्रिया श्रीनेतने इन्स्टाग्रामवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. भाजपाची मंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवार कंगना राणावत हिचा एक फोटो पोस्ट करून ‘मंडी मे क्या भाव क्या चल रहा है’ असा प्रश्न सुप्रिया श्रीनेतने विचारला आहे. सुप्रियाच्या या पोस्टला कंगनाने सडेतोड उत्तर दिले. कंगनाचे उत्तर व्हायरल होऊ लागले आणि काँग्रेसने सारवासारव सुरू केली आहे. सुप्रिया श्रीनेतने कंगनाबाबतची पोस्ट डीलीट केली. यानंतर हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी कंगना ही हिमाचल प्रदेशची मुलगी असल्याचे वक्तव्य केले.