पुणे, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत अधिकृतरित्या फक्त एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या उमेदवाराचे नाव काय असेल याचेही स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले. पहिल्या यादीत बारामीच्या उमेदवाराच्या नावाचा उल्लेख नव्हता. पण तुमच्या मनात जे आहे तेच होईल, उमेदवाराची घोषणा लवकरच करू, असे मोघम वक्तव्य अजित पवारांनी केले. त्यांनी पक्षाची पुढील यादी गुरुवारी जाहीर करणार असल्याचे सांगितले. महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद गुरुवार २८ मार्च रोजी होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीचे उर्वरित उमेदवार जाहीर करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
१. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरेंना उमेदवारी
२. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी
शिवाजीराव आढळराव पाटील संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
पक्षप्रवेशानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा होणार