काँग्रेसच्या प्रवक्त्याची आक्षेपार्ह पोस्ट, कंगनाचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसची महिला प्रवक्ता सुप्रिया श्रीनेतने इन्स्टाग्रामवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. भाजपाची मंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवार कंगना राणावत हिचा एक फोटो पोस्ट करून ‘मंडी मे क्या भाव क्या चल रहा है’ असा प्रश्न सुप्रिया श्रीनेतने विचारला आहे. सुप्रियाच्या या पोस्टला कंगनाने सडेतोड उत्तर दिले आहे. कंगनाने सुप्रिया श्रीनेत […]

काँग्रेसच्या प्रवक्त्याची आक्षेपार्ह पोस्ट, कंगनाचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसची महिला प्रवक्ता सुप्रिया श्रीनेतने इन्स्टाग्रामवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. भाजपाची मंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवार कंगना राणावत हिचा एक फोटो पोस्ट करून ‘मंडी मे क्या भाव क्या चल रहा है’ असा प्रश्न सुप्रिया श्रीनेतने विचारला आहे. सुप्रियाच्या या पोस्टला कंगनाने सडेतोड उत्तर दिले आहे. कंगनाने सुप्रिया श्रीनेत दिलेले उत्तर समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.

कंगनाचे उत्तर जसेच्या तसे

‘प्रिय सुप्रिया, कलाकार म्हणून माझ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. ‘राणी’मधील एका भोळ्या मुलीपासून ते ‘धाकड’मधील मोहक गुप्तहेरापर्यंत, ‘मणिकर्णिका’मधील देवीपासून ‘चंद्रमुखी’तील खलनायिकेपर्यंत, ‘रज्जो’मधील देहव्यापार करणाऱ्या महिलेपासून थलायवीतील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे, आपण त्यांच्या शरीराच्या अवयवांबद्दलच्या कुतुहलापलिकडे गेले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण देहव्यापार करणाऱ्यांचे संरक्षण केले पाहिजे तसेच त्यांना चांगला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे… प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे…’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number